about image

कोकण विभागीय महासंघात आपले स्वागत आहे.

"एक संघराज्य, अनेक संधी"
कोकण विभागीय फेडरेशन - एकता आणि प्रगतीसाठी एक मजबूत व्यासपीठ

 

वैशिष्ट्ये :-

१)आंतरराष्ट्रीय व देश पातळीवरील वेळोवेळी जाहीर केलेल्या सहकारी तत्त्वांचा प्रचार प्रसिध्दी करणे व ज्या अनुषंगाने सहकारी पतसंस्थांची स्थापना करण्यास व कार्यप्रणाली ठरवण्यास मदत करणे.

२)जिल्ह्यातील नागरी व बिगरशेती पतसंस्था आणि पगारदार पतसंस्था यांचे मधील परस्पर संबंध वृध्दींगत करणे व त्यांच्या कार्यात समन्वय साधणे.

३)सहकारी पतसंस्थांना त्यांच्या व्यवसायात आर्थिक कायदेशीर व प्रशासकीय बाबतीत मार्गदर्शन करणे व सल्ला देणे.

४)सहकारी पतसंस्थांमध्ये व्यावसायिकता दृष्टीकोन वाढविण्यासाठी व कार्यक्षमता वृध्दींगत करण्यासाठी पतसंस्थांच्या प्रगतीकरता आवश्यक ती सर्व सेवा उपलब्ध करून देणे व त्या अनुषंगाने यंत्रणा व्यवस्था निर्माण करणे.

५)पतसंस्थांच्या विविध पातळीवरील संघीय संस्थांत समन्वय साधणे, राज्य पातळीवरील पतसंस्थांच्या विविध धोरणाबाबत जिल्ह्यातील पतसंस्थांना अवगत करणे व त्यांचे शासनाकडे सामुहिक नेतृत्व करणे त्यासाठी विविध प्रश्नाबाबत बाजू मांडणे, चर्चा करणे व धोरणात्मक निर्णय घेणे.

६) जिल्ह्यातील पतसंस्थांच्या पदाधिकारी, संचालक, अधिकारी, सेवक व सभासद यांना प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणासाठी सोयी उपलब्ध करून देणे, फेडरेशनच्या सभासदांसाठी शिक्षण - प्रशिक्षणाबाबत अभ्यास दौरे आयोजन करणे व राज्यातील आणि देशातील सहकारी संस्थांचे कामकाज पतसंस्थांना अवगत करणे.

७)पतसंस्थांना केंद्र शासन, राज्य शासन, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, राज्य बँक, जिल्हा बँक व इतर वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे व तशा योजना राबविणे व अर्थ पुरवठा करणे.

८)राज्य शासनाने सुचविल्यानुसार इतर कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय करणे, सभासद पतसंस्थांचे ठेवीदार, कर्जदार ग्राहक यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संलग्नता निर्माण करणे, आर्थिक, तांत्रिक, कायदेशीर संगणक आधारित सेवा उपलब्ध करणे.

९)फेडरेशनच्या उद्देश पुर्तीसाठी स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करणे, बांधकाम करणे, मालकी हक्काने खरेदी करणे, भाड्याने घेणे - देणे तिची निगा राखणे, स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करण्यासाठी निधी उभारणे.

१०)फेडरेशनच्या कामकाजाकरीता अधिकारी / सेवक नियुक्त करणे व त्यांचे सेवानियम तयार करणे, पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी आवश्यक ती यंत्रणा निर्माण करणे, राबविणे, विशेष वसुली व विक्री अधिकारी यांची नियुक्ती करणे, वसुली यंत्रणेसाठी शासनाने अधिकारी परनियुक्तीवर घेणे, नेमणे.

११)पतसंस्थांच्या कामकाजाच्या सुसूत्रीकरणाकरीता कोअर बँकींग, ऑनलाईन बँकींग, नेट बँकींग, मोबाईल बँकींग व ए.टी.एम. सेवा सारख्या यंत्रणा निर्माण करणे व पतसंस्थांना त्याची सुविधा उपलब्ध करून देणे.

१२)सहकारी पतसंस्थांना आवश्यक असणारी सर्वप्रकारची स्टेशनरी व साहित्य तसेच विविध योजनासाठी नमुना नियमावली व कागदपत्रे पुरविणे.

१३)सहकारी पतसंस्थांच्या संचालक मंडळाची निवडणुक घेण्यास, निवडणुक प्राधिकरणास सहाय्य करणे.

१४)सहकारी पतसंस्थांसाठी वेळोवेळी कर्जधोरण व गुंतवणूक धोरण ठरविणे तसेच पतसंस्थांसाठी उपविधी तयार करणे व सहकार खात्याच्या मान्यतेने पतसंस्थांना पुरविणे.

१५)वरील उद्देशाव्यतिरिक्त फेडरेशनच्या व त्यांच्या सभासदांच्या हितासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक त्या गोष्टी करणे.

आमचे संचालक मंडळ

नवनिर्वाचित संचालक मंडळ
२०२५-२६ ते २०३०-३१ पर्यंत

कोणताही संचालक सदस्य आढळला नाही.

आमचे कर्मचारी सदस्य

कोणताही कर्मचारी आढळला नाही.